असा राजा जो आपल्या लिंगावर हिरा बांधून फिरत असे – “कामक्रिडेचा बादशाह”

असा राजा जो आपल्या लिंगावर हिरा बांधून फिरत असे – “कामक्रिडेचा बादशाह”

भारतात असे एक महाराज होते जे उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शाही स्विमींगपूलमध्ये मद्याचे घोट घेत रासलिला करायचे. आपल्या सर्व दासींना ते चौहोबाजूने बसवून क्रमवार एक मद्याचा घोट आणि एका दासीवर प्रेमवर्षावर करत दिवस घालवायचे. त्यांचे रासलीलेचे वारू इतके उधळले की ते आपल्या लिंगावर हिरा बांधून फिरत असत अस सांगितलं जातं.

 

  • ही कथा आहे पतियाला संस्थानच्या राजा भूपिंदरसिंह या महाराजांची.

पतियाला संस्थान हे भारतातल्या प्रमुख संस्थानांपैकी एक गणलं जातं. आज या संस्थानाचे वंशज कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबचे मुख्यमंत्री आहेत यावरुन या संस्थानचा पंजाबच्या राजकारणातला प्रभाव लक्षात येईल. कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे आजोबा म्हणजेच राजा भूपिंदर सिंह हे पतियाला संस्थानचा कामक्रिडेचा बादशाह म्हणून ओळखले जात होते. भूपिंदरसिंह महाराजांचा जन्म १८९१ चा. त्यांच्या वडिलांच निधन हे भूपिंदर महाराज अवघ्या ९ वर्षाचे असतानाच झालं. वडलांच्या निधनानंतर १९०० साली महाराज पतियाला संस्थानच्या राजगादीवर विराजमान झाले. लहान वयातच राजकारभार हाती आल्यानं महाराजांचा अश्व असा काही उधळला की तो भल्याभल्यांना सापडू शकला नाही.


  • क्रिडारसिक असणाऱ्या महाराजांची काही प्रमुख वैशिष्ठे –
  • भारतातील पहिलं विमान घेण्याचा मान या महाराजांना जातो.
  • या महाराजांकडे ४० रोल्स रॉईल्सगाड्या होत्या. यापैकी किमान २० गाड्यांचा ताफा घेवून महाराज भटकंती करत.
  • महाराजांचे जवळचे मित्र म्हणजे हिटलर होते. हिटलरने महाराजांसाठी खास मेबॅक कार गिफ्ट दिली होती.
  • महाराजांनी जनरल डायर ने केलेल्या गोळीबारास अर्थात जालियलवाला बाग हत्याकांडास पाठिंबा दिला होता.
  • अकाली दलात हेरगिरी करून ब्रिटीशांना मदत करण्याचे आरोप त्यांच्यावर वारंवार केले जात असत.

 


  • आत्ता जाणून घेवुया या महाराजांचे क्रिडाविषयक धोरण –
  • महाराजांच्या जनानखान्यात एकूण ३७० हून अधिक सेविका होत्या.
  • महाराजांच्या पाच अधिकृत पत्नी होत्या व त्यांच्यापासून महाराजांना सुमारे तब्बल ८८ मुलं झाली होती.
  • महाराजांना या सेविकांचा मेकओव्हरकरायला आवडत असते त्यासाठी महाराजांनी फ्रेन्च आणि ब्रिटीश डॉक्टरांची एक टिम सोबत ठेवली होती. हि टिम महाराजांना आवडतील अशी फॅशन करुन घेत शिवाय प्लॅस्टिक सर्जरीसाठी   देखील महाराजांनी एक टिम केली होती.
  • स्वतच्या व्यक्तिगत खोल्या महाराजांनी EXOTIC प्रकारे रंगवल्या होत्या. नग्न महिलांच्या चित्रांनी हा महल भरलेला असे. महाराज या खोल्यांमध्ये खास ब्रिटीश महिलांसाठी पार्टीचं आयोजन करत असत.
  • महाराजांच्या खोल्यांमध्ये जवळपास सर्वच लैंगिक आसने चितारण्यात आली होती. ही आसने महाराज स्वत: करत असं म्हणलं जातं.

 

खुशवंत सिंग “द मॅग्निफिशंट महाराजा” या पुस्तकात भूपिंदर महाराजांच वर्णन करताना म्हणतात, तो एक लबाड, क्रूर, स्रीयांचा नाद असणारा राजा असून ब्रिटीशांकडून मेडल्स मिळवण्यासाठी तो दूसऱ्या महायुद्धात सहभागी असल्याचं शूरपणा सांगत होता.”


अशा या घनघोर महाराजांचा मृत्यू साली २३ मार्च १९३८ साली झाला. फ्रिडम ऑफ मिडनाईट या पुस्तकानुसार संभोग करण्याची क्षमता कमी झाल्याने महाराजांनी जीवनाला कंटाळून आत्महत्या केल्याचा उल्लेख केला आहे.


Comments

Popular posts from this blog

Yashodharman

Varāhamihira

महान सम्राट कृष्णदेव राय