जहांगीर
पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड
प्रकरण ३ रें;
हिंदुस्थानचा इतिहास
जहांगीर - यानें मुसुलमानी धर्माचें रक्षण करण्याची शपथ घेऊन राज्यारोहण केल्यानें सर्व मुसुलमान सरदार त्याला मिळाले. त्यानें कांहीं किरकोळ कर बंद केले. जहांगीर गादीवर आल्यावर थोड्याच दिवसांत त्याच्या खुश्रु नांवाच्या मुलाने बंड केलें. तें जहांगीरनें मोडून अपराध्यांस क्रूर शिक्षा दिल्या (१६०६) व खुद्द खुश्रुचे डोळे काढण्याचा प्रयत्न केला त्यांत त्याचा एक डोळा शाबूत राहिला. शीख गुरू अर्जुन यानें खुश्रूला नुसती पैशाची मदत केल्यानें त्याचा अत्यंत छळ केला व शेवटीं त्याला ठार मारलें. खुश्रूला दहा वर्षे (१६१६) पर्यंत कैदेंत ठेविलें होतें, तरी त्याच्यावर लोकांचे प्रेम जास्त होतें. जहांगीरनें नूरमहलच्या नवर्याचा नायनाट करून तिला आपली मुख्य राणी केलें व तिचें नांव नूरजहान ठेवलें (१६११). तिनें तत्काळ आपली छाप जहांगीरवर बसविली व यापुढें जहांगीरच्या अखेरपर्यंत तीच खरी बादशहा होती. तिचें नांवहि जहांगीरच्या नाण्यांवर कोरलें होतें. पुढें जहांगीर हा बापासारखा धर्माच्या बाबतींत बराचसा उदार बनला. यावेळीं इंग्रजांनीं व्यापारासाठीं जहांगीरशीं खटपटी चालविल्या पण त्या पोर्तुगीजांनीं निष्फळ केल्या (१६११). बंगाल व दक्षिण इकडे बंडाळ्या झाल्या. पैकीं जहांगीरचा अंमल दक्षिणेंत शेवटपर्यंत बसलाच नाहीं. पोर्तुगीजांची व बादशाही आरमाराची दर्यावरील व्यापारासाठीं नेहमीं झटापट होत असे. त्यांत फिरंग्यांची बहुधां सरशी होत असे. मेवाडच्या राणा अमरसिंहानें अनेक वर्षाच्या लढायांनां कंटाळून जहांगीरची सत्ता कबूल केली (१६१४). जहांगीरनेंहि मेवाडच्या घराण्याला सन्मानानें वागविलें. हिंदुस्थानांत पहिली प्लेगाची सांथ १६१६ त उत्पन्न होऊन ती जवळ जवळ आठ वर्षे टिकली व हजारों लोक मेले. पुढें १७०३-०४ सालीं पुन्हां प्लेग उद्भवला तो दक्षिणेंत उद्भवला, नंतर १८१२ त कच्छ व गुजराथेंत उद्भवला आणि १८९६ त मुंबई, पुण्यास उमटला. इंग्लडचा जेम्स १ ला यानें थॉमस रो याला व्यापाराच्या सवलती मागण्यासाठीं जहांगीरकडे पाठविलें (१६१५), पण त्याच्यानें विशेषसे, काम झालें नाहीं. जहांगीरनें १६२० त कांग्रा प्रांत घेऊन तेथील मुख्य देवळांत गोहत्या केली. त्यापुढें शहाजहानननें आपला वडील भाऊ खुश्रू याचा खून करविला पण त्याबद्दल जहांगीरनें कांहीच रोष दर्शविला नाहीं (१६२२). याच वर्षी इराणच्या शहा अब्बासनें कंदाहार प्रांत घेतल्यानें जहांगीरनें शहाजहान यास त्याच्यावर पाठविलें, पण त्यानें बापाच्याविरुध्द बंड करून बराच धुमाकूळ उडविला. तेव्हां त्याचा बलोचपूर येथें पराभव केल्यानें तो दक्षिणेंत पळून निजामशाहींतील मलिक अंबरास मिळाला. तेथेंहि पाठलाग झाल्यानें तो बंगालकडे पळाला. अखेरीस (१६२५) बापलेकांची समजूत पटली. या सुमारास नूरजहानचें प्रस्थ फार माजलें होतें, त्यामुळें दरबार्यांचा तिच्यावर रोष होता. त्यांच्यापैकीं महबतखानानें एकदां जहांगीरास पकडून तिला पळवून लावलें परंतु तिच्या युक्तीनें हा डाव फसला व महबतखान दक्षिणेंत पळून गेला. यावेळीं शहाजहाननें आपला भाऊ पर्विझ याला विष देऊन मारलें. इकडे जहांगीरहि काश्मीरप्रांतीं मरण पावला (१६२७). जहांगीर हा अकबरापेक्षां कमी दर्जाचा होता. तो फार दारूबाज, नूरजहानवर नेहमीं अवलंबून रहाणारा, थोड्याशा चुकींसाटींहि अपराध्यांनां अमानुषपणें ठार करणारा, पण त्याबरोबरच वेळीं दयाळु, न्यायी, व राज्यकारभार चांगल्या प्रकारें पाहणारा, चित्रकलेचा व गायनकलेचा शोकी, स्वतः चित्रें काढणारा व धार्मिक बाबतींत थोडाबहुत उदासीन होता. त्यानें गुजराथेतील जैनांचा फार छळ केला, बापासारखी त्याला हिंदु धर्माची ओढ नव्हती. सरकारचा खर्च फार उधळ्या होता. दरबारी खर्च (सोन्याच्या तुला करणें वगैरे) हि विलक्षण होता. हाकीन्स नांवाच्या चारशें स्वारांच्या सूरोपियन मनसबदाराला सालीना ३० हजार रु. पगार होता. लोकोपयोगी कामें त्यानें फारशीं केलीं नाहींत, त्यानें आपल्या १९ वर्षाचें एक आत्मचरित्र लिहिलेलें प्रसिध्द झालें आहे. फारशी वाङ्मयास त्यानें उत्तेजन दिलें. अबुल हसन व मनसूर हे त्याचे प्रसिध्द चित्रकार होते. आग्य्राचें इतिमदुद्दवल्याचें, शिकंदरा येथील अकबराचें व लाहोर येथील खुद्द जहांगीरचें थडगें हीं त्या वेळचीं उत्तम शिल्पकामें होत.

Comments
Post a Comment