अहमदनगरची निजामशाही

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण ३ रें;
हिंदुस्थानचा इतिहास

अहमदनगरची निजामशाही - विजयानगरचा तिमाप्पा बहीरव याचा पुत्र बाटल्यावर महमूद बहामनीचा एक मोठा सरदार बनला. त्यानें निजामुल्मुल्क हें नांव धारण करून दक्षिणीतटाचा पुढाकार घेतला. याचा मुलगा मलीक अहमद या जुन्नर प्रांताचा सुभेदार होता, त्यानें १४९० त स्वतंत्र राज्य स्तापलें व लष्करीदृष्टया उपयोगी असें अहमनदगर शहर स्थापून तेथें राजधानी केली आणि स्वतःस निझामशहा पदवी घेतली. त्यानें अनेक वर्षे खटपट करून १४९९ त दौलताबाद (देवगिरि) किल्ला हस्तगत केला व राज्य वाढविलें. त्याचा पुत्र बुर्‍हाण यानें ४५ वर्षे राज्य करून व शेजारच्या राजांशीं लढाया करून राज्य बळकट केलें. त्यानें एकदां आदिलशहा विरुध्द विजयानगरकरांस मदत केली होती; परंतु त्याचा मुलगा हुसेन हा तालीकोटच्या लढाईत मुसुलमानांच्या बाजूनें होता. या घराण्यानें १५७४ त वर्‍हाडचें राज्य जिंकलें. प्रसिध्द चांदबिबी ही या हुसेनची मुलगी व अल्ली आदिलशहाची बायको होय. तिनें अकबाराच्या विरुध्द अहमदनगरचें मोठ्या शौर्यानें रक्षण केलें (१५९६); परंतु पुढें तिच्या एका सरदारानें तिचा खून केला व अहमदनगर पडलें (१६००). तत्रापि पुढें बराच काळ मलिकअंबर आणि शहाजी राजे यांनीं ती तगविली. अखेर आदिलशहाच्या विश्वासघातानें शहाजीचा नाइलाज होऊन निझामशाहीचा अंत झाला (१६३७). तत्पूर्वी कित्येक वर्षे शहाजी हाच निजाशाहीचा खरा मालक होता.

Comments

Popular posts from this blog

Yashodharman

Varāhamihira

महान सम्राट कृष्णदेव राय