मंख (सुमारें ११२०-११७०)- काश्मीरस्थ संस्कृत कवि

 मंख (सुमारें ११२०-११७०)- काश्मीरस्थ संस्कृत कवि. श्रीकण्ठचरित नांवाच्या २५ सर्गाच्या महाकाव्यांत त्यानें स्वतःविषयीं जी माहिती दिली आहे तीवरून काश्मीरचा राजा जयसिंह (११२७-११४९) याच्या काळीं ता होता असें निश्चितपणें म्हणतां येतें. याच्या बापाचें नांव विश्र्ववर्त असें होतें. याचा प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे श्रीकण्ठचरित होय; हा हल्लीं छापून प्रसिद्ध झाला आहे. या ग्रंथांत त्रिपुरवधाची हकीकत आली आहे. याशिवाय मंखानें मंखकोश म्हणून एक शब्दकोशहि केला असून त्याचा उल्‍लेख हेमचंद्रानें आपल्या कोशांत केलेला आहे.

Comments

Popular posts from this blog

Yashodharman

Varāhamihira

महान सम्राट कृष्णदेव राय