समर्थ संप्रदाय
समर्थ संप्रदाय समर्थसंप्रदाय हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय. समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवकालात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या कवींनी विपुल लेखन केलं आहे. या संप्रदायाची हस्तलिखिते मुख्यत्वेकरून धुळ्याच्या श्रीसमर्थ वाग्देवता मंदिरात उपलब्ध होतात. ती मिळविण्यासाठी समर्थभक्त शंकरराव देव यांनी अपार परिश्रम केले. त्यामुळे हा मौलिक संग्रह आजवर टिकून राहिला. शिष्यमंडळ संपादन करा कल्याण स्वामी समर्थांनी त्या काळी ११०० मठ स्थापन केले आणि सुमारे १४०० तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली.त्यांचे काही शिष्य गृहस्थाश्रमी होते, तर काही शिष्य ब्रम्हचारी होते.ज्या वेळी एखाद्या शिष्याची महंतपदी नियुक्ती होत असे त्या वेळी त्या शिष्याची कसून परीक्षा घेतली जाई.समर्थांना शिष्याकडून कठोर साधनेची आणि अभ्यासाची अपेक्षा होती.दासबोधाचे नुसते पारायण करून भागात नव्हते, दासबोध समजाऊन घेण्यावर समर्थांचा भर होता.अनेक महंतांचा दासबोध कंठस्थ होता.शिष्याची परीक्षा घेण्याची समर्थांची पद्धत मोठी विलक्षण होती.त्यावेळी ग्रंथ छापले जात नसत.हाताने ल...